बिनभांडवली आणि कमी भांडवली व्यवसायांची यादी | low investment business ideas in marathi

बिनभांडवली व्यवसायांची यादी, कमी भांडवलामध्ये सुरू होणाऱ्या व्यवसायांची यादी | low investment business ideas in marathi

मित्रांनो, प्रत्येकाला आपला एक स्वतःचा व्यवसाय असावा असं वाटतं, पण स्वतःचा व्यवसाय करायचा झाला तर त्याला भांडवल असावा लागतो. म्हणूनच काही लोक या कारणामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकले नाहीत. कारण त्यांना त्या व्यवसायाबद्दल पुरेशी माहिती नसते. पण तुम्ही कमी भांडवलामध्ये देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे जो व्यवसाय तुम्ही सुरू करणार आहात त्या व्यवसायाबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे गरजेचे असते.  त्याचबरोबर त्या व्यवसायामध्ये तुमची विशेष अशी आवड असली पाहिजे. फक्त व्यवसाय सुरू करून चालणार नाही, तर तो व्यवसाय आपल्याला दीर्घकाळासाठी किती नका देईल याचा पण विचार करावा लागेल.

काही लोक नोकरी करतात पण त्यांना आपल्या नोकरी मधून पुरेशी रक्कम भेटत नाही. त्यांनादेखील स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. आजच्या महागाईच्या युगात नोकरी बरोबर जोडधंदा पण करावा लागतो. पण काही असेही व्यवसाय आहेत जे तुम्ही तुमच्या नोकरी बरोबर पार्ट-टाईम करू शकता.

तर मित्रांनो, तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काही बिनभांडवली आणि कमी भांडवलामध्ये सुरू होणाऱ्या व्यवसायांची यादी तयार केली आहे. (low investment business ideas in marathi) जो पाहून तुम्ही सुद्धा स्वतःचा एक व्यवसाय सुरू करू शकता. जो तुम्ही भविष्यामध्ये मोठा करू शकता. 

Table of Contents, table

बिनभांडवली व्यवसायांची यादी, कमी भांडवलामध्ये सुरू होणाऱ्या व्यवसायांची यादी | low investment business ideas in marathi यादी पुढील प्रमाणे –

ज्यूस विकण्याचा व्यवसाय –

आज-काल शहरी भागामध्ये ज्यूस पिणार्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर गावांमध्ये देखील त्याची मागणी असते. तुम्ही वेगवेगळ्या  फळांचा ज्यूस बनवून विकू शकता. हे ज्यूस हेल्दी असल्यामुळे लोकांची त्याला पसंती असते तुम्ही हा व्यवसाय कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता.

डिजिटल मार्केटिंग बिनभांडवली व्यवसाय-

आजच्या युगात इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेट ने अपने जीवन सोपे केले आहे. आपण मोबाईल आणि लॅपटॉप द्वारे घरबसल्या सुविधांचा आनंद देऊ शकतो.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुमच्या वस्तू आणि सेवांचे डिजिटल उपकरणांचा वापर करून मार्केटिंग करणे होय. यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. या व्यवसायाला आज आणि भविष्यामध्ये खूप मागणी आहे.

कंपन्यांना चहा नाश्ता देण्याचा व्यवसाय-

वेगवेगळ्या कंपन्या, हॉस्पिटल्स यांना भेट देऊन  त्यांना सकाळचा चहा नाश्ता आणि दुपारचे जेवण देऊ शकता. वेगवेगळ्या कंपन्या आणि हॉस्पिटल्स यांची ऑर्डर घेऊन तुम्ही तो डेली पाठवू शकता. हा व्यवसाय तुम्ही कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता.

टिफिनची सर्विस –

शहरी भागामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी  गेलेल्या लोकांना तुम्ही डबा पोचवण्याचा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय तुम्ही कमी भांडवलामध्ये  सुरू करू शकता. या व्यवसायामध्ये खूप नफा आहे.

प्रिंट आणि झेरॉक्स व्यवसाय –

हा व्यवसाय तुम्ही ऑफिस शाळा अशा ठिकाणी सुरू करू शकतो हा व्यवसाय देखील कमी भांडवलामध्ये सुरू  करू शकता. बऱ्याच ठिकाणी झेरॉक्स आणि प्रिंट काढण्याची मागणी असते, अशा ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

शिलाई सेंटरचा व्यवसाय –

हा व्यवसाय तुम्ही घरी बसून देखील करू शकता.  घरी बसून मास्क शिवण्याचे काम घेऊ शकतो. त्याच बरोबर वेगवेगळ्या डिझाईनची  शिवणकाम तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही कंपनीची भेट घेऊन त्यांची ऑर्डर देऊ शकता.

किराण्याचे दुकान –

किरणाचा व्यवसाय हा दैनंदिन गरजांच्या वस्तूंशी निगडित असल्यामुळे हा व्यवसाय खूप चालणार आहे. हा व्यवसाय तुम्ही कमी भांडवलामध्ये देखील सुरू करू शकता.

सजावट करण्याचे काम –

लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस असो सजावट ही आलीच. म्हणून आजच्या धावपळीच्या युगात वेळेअभावी लोक कार्यक्रमासाठी सजावट करणाऱ्यांना बोलावतात. या व्यवसायाला सध्या खूप मागणी आहे. अशावेळी तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

गाडी चालवणे किंवा भाड्याने देणे –

जर तुमच्याकडे एखादी कार किंवा बाईक असेल तर तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही तुमचे वाहन भाड्याने देऊ शकता किंवा स्वतः  ही  चालवू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमचे वाहन ओला किंवा उबर मध्ये रजिस्टर करू शकता. हा एक बिनभांडवली व्यवसाय होऊ शकतो.

अगरबत्ती आणि मेणबत्तीचा व्यवसाय –

अगरबत्ती आणि मेणबत्ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये  लागणाऱ्या वस्तू आहेत.  यांची मागणी जास्त असते. तसेच  बाजारामध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या मेणबत्ती ना खूप मागणी आहे. तुम्ही या मेणबत्त्या ऑनलाइन जास्त किमती मध्ये विकू शकता.  या व्यवसायासाठी तुम्हाला अगरबत्ती आणि मेणबत्ती बनवणाऱ्या मशीनची गरज पडेल आणि त्यासाठी लागणारे सामान.

हॉटेलचा व्यवसाय –

रोज रोज घरचे जेवण खाऊन कंटाळलेले लोक हॉटेल किंवा धाब्यावर चे जेवण खाण्यासाठी जातात. आणि म्हणूनच  हा व्यवसाय वर्षाचे बाराही महिने चालणार आहे. या व्यवसायामध्ये  मिळकत ही खूप आहे.  हा व्यवसाय तुम्ही सुरुवातीला कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता.

भाजी किंवा फळ विकण्याचा व्यवसाय –

तुम्ही फळ किंवा भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय शहरी भागामध्ये खूप चांगला चालू शकतो. कारण शहरांमध्ये  त्याची खूप मागणी असते. गावांमधून तुम्ही हा माल शहरांमध्ये आणून  विकू शकता.  हा व्यवसाय तुम्ही कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता.

ऑनलाईन वस्तू विकण्याचा व्यवसाय –

आज-काल मोबाईल वापरण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याचबरोबर ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही तुमच्या वस्तू ऑनलाइन विकू शकता.  त्यासाठी तुम्हाला स्वतःची इ कॉमर्स वेबसाइट बनवावी लागेल. हा व्यवसाय तुम्ही कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला एक डोमेन आणि होस्टिंग खरेदी करावी लागेल. त्यानंतर इ कॉमर्स वेबसाइट तयार करावे लागेल. हा एक बिनभांडवली व्यवसाय होऊ शकतो.

ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय –

या व्यवसायासाठी तुम्ही एक ऑफिस ओपन करू शकता.  ट्रॅव्हल मालकाशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्या ट्रॅव्हल्सचे बुकिंग घेऊ शकता.  या व्यवसायामध्ये  चांगला नफा आहे आणि हा व्यवसाय तुम्ही कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता.

चहा विकण्याचा व्यवसाय –

हा व्यवसाय खूप कमी भांडवला मध्ये सुरू होतो आणि खूप चांगला चालतो कारण चहा हे खूप जास्त पिले जाणारे पेय आहे. या व्यवसायामध्ये नफा ही खूप चांगला आहे.

सकाळच्या नाष्टाचा व्यवसाय –

आज कालच्या धावपळीच्या युगात सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी वेळ भेटत नाही म्हणून त्यांना बाहेरच खावे लागते. म्हणून अशावेळी काहींचे नाश्ता करण्यासाठी ठरलेले ठिकाण असते. सुरुवातीला  तुम्ही हा व्यवसाय कमी भांडवलामध्ये सुरू करू शकतात, नंतर तो तुम्ही वाढवू शकता.

ट्यूशन घेणे –

प्रत्येक पालकांना आपल्या मुलाच्या शिक्षणाचे टेन्शन असते. आपल्या मुलांचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी ते खूप मेहनत घेतात. म्हणून आज काल मुलांना प्रायव्हेट स्कूल मधील शिकवण्याच प्रमाण वाढले आहे. पण अशावेळी मुलांना ट्यूशनची गरज पडते. अशावेळी तुम्ही ट्यूशन घेण्याची काम करू शकता. हा एक बिनभांडवली व्यवसाय होऊ शकतो.

कार आणि बाईक वॉशिंग सेंटर –

आजकाल कार आणि बाईक चे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन वाहने असतातच. अशा वेळी लोकांना आपल्या वाहनांसाठी वाशिंग सेंटरची गरज पडते सध्या या व्यवसायाला खूप डिमांड आहे. तुम्ही हा व्यवसाय कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता

आईस्क्रीम पार्लरचा व्यवसाय –

लहान असो किंवा मोठा प्रत्येकाला आईस्क्रीम खाण्याची आवड असते. म्हणून हा व्यवसाय खूप चांगला चालतो. तुम्ही स्वतःचे एक आईस्क्रीम पार्लर सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही कमी भांडवलामध्ये  सुरू करू शकता

ब्लॉगिंग करण्याचे काम, एक बिनभांडवली व्यवसाय –

तुम्ही जर चांगले लिहू शकत असाल तर तुम्हीही ब्लॉक करू शकता. आज काल लोक पार्ट टाइम ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवत आहेत. त्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट बनवावी लागेल, आणि वेबसाईट बनवण्यासाठी डोमेन नेम आणि होस्टिंग गरज असते.

फर्नीचरचा व्यवसाय –

हा व्यवसाय तुम्ही खेडे गाव किंवा शहरामध्ये सुरू करू शकता. आजकाल लोकांचा नवनवीन फर्निचर खरेदी करण्याचा कल वाढला आहे. कारण एखाद्या नवीन घरामध्ये नवीन फर्निचरची गरज असतेच आणि लोक ते खरेदी करतातच. त्याचबरोबर एखाद्या कार्यक्रमामध्ये गिफ्ट म्हणून फर्निचरची खरेदी ही केली जाते. म्हणून हा व्यवसाय खूप नफ्याचा आहे. हा व्यवसाय सुरुवातीला कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता.

कंपन्यांसाठी सोशल मीडिया अकाउंट्स मॅनेज करणे –

मोठं मोठ्या कंपन्यांचे सोशल मीडिया वर अकाउंट्स असतात. कंपन्यांना ते दररोज मॅनेज करावं लागत. पण काही वेळेला त्यांना ते मॅनेज करता येत नाही, अशा वेळी ते आपलं काम आऊट सोअर्स करतात. म्हणजे आपले सोशल मीडिया अकाउंट्स मॅनेज करण्यासाठी दुसर्यांना देतात. अशा वेळी तुम्ही ही हे काम करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला त्या विषयी माहिती असणे गरजेचे असते. तुम्ही हे काम ऑनलाईन शिकू शकता. त्यानंतर तुम्हीही हे काम करू शकता. ह्या कामासाठी तुमच्याकडे मोबाइल किंवा कॉम्प्युटर असणे कर्जेचे आहे.

वॉटर प्युरिफायर विकण्याचा व्यवसाय –

आजकाल बऱ्याच ठिकाणी म्हणजेच कंपन्या आणि ऑफिसेस मध्ये प्युरिफाइड वॉटरचा (शुद्ध पाणी ) वापर केला जातो. त्याचबरोबर कार्यक्रमांमध्ये देखील प्युरिफाइड वॉटरचा उपयोग वाढत आहे. तुम्ही सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला वॉटर प्युरिफायर मशीन घ्यावी लागेल. त्यानंतर काही कंपन्यांशी कॉन्ट्रॅक्ट करून त्यांना सप्लाय करावे लागेल.

दूध, दही आणि तूप विकणे –

शहरी भागामध्ये दूध, दही आणि तूप ह्यासारख्या खाद्यपदार्थाना खूप मागणी आहे. पण शहरी भागामध्ये पाकिटामधले खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात विकले जाते. कारण तिथे शुद्ध दूध, दही आणि तूप मिळणे खूप कठीण असते. अशा वेळी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. शुद्ध खाद्यपदार्थ तयार करून तुम्ही तो माल शहरी तसेच गावांमध्ये विकू शकता. हा व्यवसाय एक घरगुती व्यवसाय आहे.

इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान –

ह्या व्यवसाया संबंधित वस्तूंचा वापर सर्व वर्गातील लोक करतात. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक शॉप मधील पंखा, कूलर, फ्रिज, वायर, बोर्ड, वायरिंग पाइप, स्विच अशा अनेक वस्तू विकण्यासाठी वेळ नाही लागत. ह्या वस्तूंना वर्तमान काळामध्ये डिमांड आहेच पण भविष्यामध्ये देखील ह्याची डिमांड वाढतच राहील. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एका दुकानाची व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची गरज पडेल.

युट्यूब वर वीडियोस अपलोड करून पैसे कमावणे –

यु ट्यूब हे एक विडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. जिथे कोणीही आपले व्हिडिओस विना मूल्य शेअर करू शकतात. तसेच त्यातून पैसे ही कमऊ शकतात. यु ट्यूब वर दररोज लाखो व्हिडिओस अपलोड केले जातात. यु ट्यूब वर तुम्हीही विनामूल्य काम करू शकता आणि खूप पैसे कमावू शकता. त्यासाठी तुम्हाला यु ट्युबवर आपले अकाउंट काढावे लागेल आणि त्यानंतर व्हिडिओस अपलोड करावे लागेल. हा एक बिनभांडवली व्यवसाय आहे.

एफिलिएट मार्केटिंग चा व्यवसाय –

वाढत्या टेकनॉलॉजी बरोबरच पैसे कमावण्याचे मार्ग ही वाढले आहेत. ऑनलाईन सामान विकणाऱ्या पुष्कळ कंपन्या आपले अफिलिएट प्रोग्रॅम चालवत आहेत जसे की ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अशा अनेक कंपन्या आहेत. अशा कंपन्यांचे अफिलिएट प्रोग्रॅम तुम्ही जॉईन करू शकता आणि ह्या वेबसाइट मधील कोणतेही सामान तुम्ही विकू शकता. त्यानंतर त्याचे कमिशन तुम्हाला मिळेल. प्रत्येक वस्तूंचे कमिशन वेगवेगळे असते. हे काम तुम्ही पार्टटाईम घरी बसून करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल किंवा कॉम्प्युटर ची गरज पडेल. हा एक बिनभांडवली व्यवसाय आहे.

रिसेलिंगचा व्यवसाय –

आज ऑनलाईन भरपूर कंपन्या आहेत ज्यांच्या वस्तू तुम्ही डायरेक्ट विकू शकता जसे की मिशो, ग्लॉवरोड, शॉप १०१ अशा अनेक कंपन्यांचे माल तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन विकू शकता ते ही झिरो इन्व्हेस्टमेंट. त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल, इंटरनेट, सोसिअल मीडिया अकाउंट आणि बँक अकाउंट असावे लागेल. ह्या कंपन्यांचा माल तुम्ही कमी किमतीमध्ये घेऊन तो तुम्ही जास्त किमतीमध्ये विकू शकता आणि ते ही घरी बसून. हा एक बिनभांडवली व्यवसाय आहे.

डाटा एंट्री करण्याचे काम –

डाटा एंट्री जॉब म्हणजे कोणत्याही दस्तऐवज किंवा माहितीला ऑनलाईन किंवा ऑफलाईन डेटा मध्ये संग्रहित करणे. हे काम ते लोक करू शकतात ज्यांना कॉम्प्युटरची संपूर्ण माहिती आहे आणि वर्ड, एक्सल, पॉवर पॉईंट ची माहिती आहे. तुम्ही हॉस्पिटल, कंपन्या, ऑफिसेस ह्यांच्याकडून डेटा एन्ट्री चे काम घेऊ शकता. हे काम करण्यासाठी तुमच्याकडे कॉम्प्युटर, इंटरनेट असावे लागेल. हे काम तुम्ही पार्टटाईम ही करू शकता

पापड आणि लोणच्याचा व्यवसाय –

आपला देश वेगवेगळ्या जेवण पदार्थ व त्याच्या बरोबर असणाऱ्या पापड, लोणचे ह्या साठी खूप प्रसिद्ध आहे. छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची पापड आणि लोणच्याला पसंदि असते. म्हणूनच त्याला भारतामध्ये तसेच विदेशामध्ये खूप मागणी आहे. पापडाचे व लोणच्याची वाढती मागणी पाहता वर्तमान तसेच भविष्यामध्ये हा व्यवसाय खूप चांगला विकल्प ठरू शकतो. ज्यामधून कमी भांडवलामधून जास्त नफा मिळू शकतो.

आर्टिफिशियल ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय –

भारतीयांना दागिन्यांची प्रचंड आवड आहे, मग ते मौल्यवान असो किंवा कृत्रिम दागिने. सोने-चांदीचे दर चढे असल्याने कृत्रिम दागिन्यांची मागणी वाढली आहे. तरुण पिढी आर्टिफिशियल ज्वेलरी घालण्यास प्राधान्य देते कारण ते कमी खर्चीक, जास्त स्टायलिश आणि कोणत्याही पोशाखासोबत घालता येते. भविष्यामध्ये ह्या व्यवसाय खूप मागणी वाढणार आहे.

फ्रीलांस कंटेंट रायटर चा व्यवसाय –

आजच्या काळात, कंटेंट रायटर्सना खूप मागणी आली आहे कारण आजच्या काळात लोक इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाची ऑनलाइन जाहिरात करतात आणि व्यवसायाची ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी, त्यांना एक कंटेंट रायटर आवश्यक आहे जो सामग्री लेखन लिहितो. जर तुम्ही कंटेंट रायटर झालात, तर तुम्ही तुमच्या घरी बसून लोकांसाठी कंटेंट लिहून पैसे कमवू शकता आणि त्याच वेळी तुम्हाला कंटेंट रायटरच्या नोकरीवर अनेक कंपन्यांकडून 15,000 ते ₹50,000 पर्यंत पगार मिळू शकतो.

मोबाइल रिचार्ज आणि त्याचे सामान विकण्याचा व्यवसाय –

भारतात ४५ करोडहून अधिक स्मार्टफोन वापरकर्ते आहेत, जे कालांतराने खूप वेगाने वाढत आहेत. न जाणो किती स्मार्टफोन रोज बाजारात येत आहेत, जे ग्राहकांना त्यांचे जुने फोन बदलायला भाग पाडत आहेत. अशा परिस्थितीत २०२३ पर्यंत भारतात ६५ करोड स्मार्टफोन वापरकर्ते असतील असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही फायदेशीर व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मोबाईल रिचार्ज आणि त्याचे सामान विकण्याचा व्यवसाय हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

फुलांचा व्यवसाय –

कोणत्याही उत्सवात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय वाढदिवस, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक प्रकारे ताज्या फुलांचा वापर केला जातो. भारतात जवळजवळ प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या देवदेवतांची पूजा होते, त्यामुळे भारतात फुलांचा व्यवसाय हा खूप चांगला व्यवसाय आहे. वेगवेगळ्या प्रसंगी त्यांच्या मित्रांना फुलांचे गुच्छही दिले जातात, त्यासाठी महागडी फुले वापरली जातात. त्यामुळे फुलांच्या मदतीने तुम्हीही चांगला व्यवसाय करू शकता. ह्या व्यवसायामध्ये कमी भांडवल लागते आणि नफा ही खूप चांगला आहे.

ऑनलाइन फॉर्म भरण्याचा व्यवसाय –

वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे आजकाल सर्व सरकारी सुविधांचा उपभोग आपण ऑनलाईन घेऊ शकतो. म्हणूनच सरकारी सुविधा, परीक्षेचे फॉर्म किंवा सरकारी नोकरीचे फॉर्म असो ते ऑनलाईन भरावे लागते. अशा वेळी हा व्यवसाय खूप फायद्याचा ठरतो. त्याचबरोबर खूप कमी भांडवल मध्ये सुरू होऊ शकतो.

सोशल मीडिया मधून पैसे कमावणे –

सोशल मीडिया हा आजच्या जीवनाचा एक सामान्य भाग झाला आहे. सोशल मीडियामुळेही लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे आणि त्याचा वापर प्रत्येकजण करतो.
लोक सोशल मीडियाच्या अधिकाधिक वापराचा तुम्ही अगदी सहजपणे फायदा घेऊ शकता. सोशल मीडियाच्या मदतीने तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. सोशल मीडियाद्वारे व्यवसाय करण्याचे अनेक फायदे आहेत, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी जितके हवे आहेत तितके ग्राहक तुम्हाला येथून मिळतात. हा एक बिनभांडवली व्यवसाय आहे.

पार्ट टाइम अकाउंटिंग काम करणे –

2022 हे वर्ष एक प्रकारचे ऑनलाइन आणि डिजिटल युग आहे, आजकाल आपण आपल्या फोनच्या मदतीने कोणतेही काम ऑनलाइन करू शकतो कारण आजच्या डिजिटल काळात सर्व काही शक्य आहे. जर आपण अकाउंटिंग जॉब्सबद्दल बोललो तर, आपण ऑनलाइन पार्ट-टाइम आणि पूर्ण-वेळ नोकऱ्या सहजपणे शोधू शकता आणि आपण त्या नोकरीसाठी सहजपणे अर्ज करू शकता.

योग शिकवणे –

रोज योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला खूप फायदा होतो आणि त्यामुळे योग हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नावाजलेला उपक्रम बनला आहे. तुम्हालाही योगामध्ये रस असेल, तर तुमच्यासाठी भारतात योगाच्या क्षेत्रात करिअरचे अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन ही योग शिकाऊ शकता.

इ-बुक पब्लिश करणे –

जर इंटरनेटचा योग्य वापर केला तर थोड्या मेहनतीने तुम्ही चांगली कमाई करू शकता. बरं, ऑनलाइन कमाई करण्याचे अनेक योग्य मार्ग आहेत. तुमचे पुस्तक ऑनलाइन प्रकाशित करणे आणि त्यातून पैसे कमवणे हा एक मार्ग आहे. त्यामुळे जर तुम्ही लेखक असाल आणि बऱ्याच दिवसांपासून प्रकाशक शोधत असाल, तर तुमचा शोध थांबवा, कारण तुम्ही ही इंटरनेट च्या साहाय्याने तुमचे पुस्तक प्रकाशित करू शकता. ते ही कमी खर्चा मध्ये.

वीडियो एडिटिंगचा व्यवसाय –

व्हिडीओ एडिटरचे काम म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये अनेक भिन्न व्हिडिओ एकत्र करून त्यांचे संपादन करणे, वाईट दृश्ये दुरुस्त करणे, साऊंडट्रॅक जोडणे इ. व्हिडिओ संपादन कौशल्ये अंतिम उत्पादनाची गुणवत्ता आणि वितरण निर्धारित करतात. तुम्ही कोणत्याही विशेष औपचारिक पदवीशिवाय व्हिडिओ संपादक बनू शकता. आजच्या आधुनिक युगात विडिओ एडिटरची डिमांड खूप वाढली आहे. तुम्हीही हा व्यवसाय सुरू करू शकता.

अँप्स (apps) बनवून पैसे कमावणे –

आज इंटरनेट ही जगाची पहिली पसंती आहे, कारण आजकाल बहुतांश कामे इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत. अशी अनेक एप्स लोक वेळोवेळी तयार करत असतात, ज्यामुळे लोकांची बरीचशी कामे त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून होत असतात. जसे की फ्लिपकार्ट आणि अमेझॉन एप्सवरून खरेदी करणे, झोमॅटो किंवा स्वीगी एप्सवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करणे, पेटीएम किंवा फोनपे एप्सरून बिल किंवा मोबाइल रिचार्ज भरणे, उबेर आणि ओला एप्सद्वारे टॅक्सी बुक करणे, तुम्ही जेथे जाल तेथे बातम्या ऐकणे, असे बरेच काही आहेत, ज्या मोबाईलवर उपस्थित असलेल्या एप्सद्वारे लोक अगदी सहज करू शकतात. हे एप्स बनवणारे लोक आज करोडोंची कमाई करत आहेत. तुम्हीही असे अँप्स बनवू शकता आणि पैसे कमवू शकता.

DJ साऊंड सर्विसचा व्यवसाय –

तुम्ही कुठल्या ना कुठल्या पार्टीत, फंक्शनला, लग्नाला वगैरे गेलेच असतील आणि तिथे डीजे, म्युझिक इ.ची सेवा तुम्ही पाहिली असेलच. आजच्या काळात जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात डीजेचा वापर केला जातो. आजच्या काळात, त्याची लोकप्रियता देखील खूप वाढत आहे, म्हणूनच सध्या डीजे सेवेची मागणी खूप वाढली आहे आणि तो एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय देखील बनला आहे. तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

जुन्या वाहनांची खरेदी विक्री, बिनभांडवली व्यवसाय –

आज प्रत्येकांच्या घरामध्ये स्वतःची दोन चाकी किंवा चार चाकी वाहन असते. पण कालांतराने त्यांना ते कमी किमती मध्ये विकावे लागते. अशावेळी तुम्ही अशी वाहने कमी किमतीमध्ये खरेदी करून ती जास्त दरामध्ये विकू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही अशी वाहने डायरेक्ट ग्राहकाला विकून कमिशन ही कमावू शकता. ह्या व्यवसाय मध्ये खूप नफा आहे.

इत्यादी अनेक बिनभांडवली तसेच कमी भांडवली व्यवसाय तुम्ही करू शकता. (low investment business ideas in marathi) त्याचबरोबर अजून काही व्यवसायांची यादी आम्ही तुमच्या साठी खालील प्रमाणे दिली आहे –

मोकळ्या जागेवर टॉवर लावू शकता –


एटीएम मशीन लावू शकता –


गिफ्ट चे दुकान सुरू करू शकता –


प्रॉपर्टी डीलिंग चे काम करू शकता –


करिअर चे काम करू शकता –


ऑनलाईन क्लास घेऊ शकता –


सोडा चे दुकान टाकू शकता –


पॅकिंग ची सेवा देऊ शकता –


प्राण्यांच्या खाण्याचे दुकान –

Leave a Reply

Your email address will not be published.